वर्षभरात राज्यातील सगळ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागणार ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा.….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील चालणार नाही तर त्याची व्यवस्थित देखभाल होण्याची गरज असल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. राज्यात सध्या स्थितीमध्ये एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या तसेच राज्यातील प्रत्येक शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या वर्षाभरात शाळांचा प्राधान्य क्रम ठरवून हे काम पूर्ण केले जाईल. तसेस सर्व खासगी शाळांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात येतील असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. तसेच गैर प्रकारांना आळा बसेल. येत्या वर्षभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…