सलमान खान हाजीर हो…! अंधेरी न्यायालयाचं समन्स….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूडचा दबंग सलमान खान च्या अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं समन्स बजावलं आहे. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आला आहे.
तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयानं दिले आहेत. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सलमान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. मात्र त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत त्यांच्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आणि त्यांना धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान न्यायालयात हजर राहणार की, नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रकरण नेमकं काय…?
सलमान अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सायकल चालवत असताना अशोक पांडे यांनी त्याच्या जवळपास 15 ते 20 मिनिटं त्याचा पाठलाग करत व्हिडीओ काढला. यावेळी सलमान खान आणि त्याचा बॉडिगार्डसोबत अशोक पांडे यांचा वाद झाला. या वादानंतर पत्रकार अशोक पांडे यांनी तक्रार दाखल केली. व्हिडीओ काढत असल्यानं सलमानला राग आला. त्यानंतर त्यानं मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आपल्याला शिवीगाळही केली, असा आरोपही पांडे यांनी केला आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….