शिवसेना-भाजपची पुन्हा युती होऊ शकते का…? ; राऊतांनी एका वाक्यात उत्तर दिले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर, 22 मार्च :- ‘ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती. भाजप ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर करून त्रास देत आहे.
त्यामुळे संबंध ताणले आहे, त्यामुळे परत भाजप-सेना युतीच्या प्रश्न येत नाही’ शिवसेना इतर पक्षासारखे नाही एकदा भूमिका घेतली घेतली, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली.
त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. ‘दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवसेना असाा पक्ष आहे, तिथे हे शब्द चालत नाही.
खोटे आरोप करणे हा बॉम्ब आहे का? मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे.
तो बॉम्ब नाही का? असा सवालही राऊत यांनी केला. (Gold Price Today : सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव) यूपीए सरकारच्या काळात 10 वर्षात 23 धाडी पडल्यात. मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात 23 हजार धाडी पडल्यात.
ईडी, आयकर विभागाच्या धाडी टाकून तुम्ही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकार पाडणार आणि सत्ता आणणार असा विचार करत असाल तर आम्ही खाली वाकणार नाही, मोडणार नाही, असंही राऊत म्हणाले. (पायऱ्यांवर करत होता बाईक स्टंट; तोल जाताच घडली मोठी दुर्घटना, Shocking Video) कोल्हापूरची जागा आहे, तिथे शिवसेना जिंकत आली. शिवसेना आणि भाजप एकत्र असताना आमचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. त्या ठिकाणी आता जाधव यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणुक होत आहे. सध्या तिथे त्यांचा अधिकार आहे. 2024 मध्ये पुर्नविचार केला जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….