पुढील निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने लढू पराभावानंतर आदित्या ठाकरेंच्या निर्धार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाचा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत आलेले निकाल आणि ट्रेंड पाहता, यूपीसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येताना दिसत आहे. यासंदर्भात शिवसेना नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या निकालामुळे उत्साह वाढल्याचे म्हटले आहे. कारण, ही आमची सुरूवात असून यापुढे अधिक जोमाने निवडणुकांत लढू, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. त्यामुळे ४१ ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला किती मतदान झालं? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रीय राजकारणात छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. यूपी, गोवासारख्य राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेनेला दारुण पराभव झाला. या पराभवानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी ही लढाईची सुरूवात असल्याचं म्हटलं.
उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने निवडणूक लढवली. पण, शिवसेनेला दोन्ही राज्यात अपयश आल. पण, हे अपयश नसून ही शिवसेनेची इतर राज्यात निवडणूक लढविण्याची सुरुवात असल्याचं शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आजच्या निकालामुळे ताकद आणि हिंमत वाढली आहे, उत्साह वाढला आहे. कारण, यापुढे अधिक ताकदीने आम्ही निवडणुका लढवू. महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढविण्यास कुठेतरी सुरुवात झाली, हे सकारात्मक बाब आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
महाराष्ट्र सरकार मजबूत
या निकालाचा महाराष्ट्र सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचं काम उत्तम आहे. महाराष्ट्राला देशात भक्कम बनविण्याचं काम आम्ही करू, असेही आदित्य यांनी म्हटले.
पराभव हा अंतिम नसतो – राऊत
कोणत्याही निवडणुकीत पराभव हा अंतिम नसतो, ती एक सुरुवात असते, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. लढाई संपली असा अर्थ होत नाही. उत्तर प्रदेशात आम्ही जिथे लढलो, ती आमची सुरुवात आहे. लोकांसाठी काम करत राहू, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, सदर निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अत्यंत वाईट पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. पंजाबमधील लोकांना आणखी एक पर्याय मिळाला आणि त्यांनी आपला निवडले. भाजपचा विजय हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….