‘दूध का दूध पानी का पानी होणार , फडणवीस यांच्या आरोपावर गृहमंत्री आज उत्तर देणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईन
मुंबई :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरील माझे संपूर्ण उत्तर तयार होते. मात्र त्यांनीच विनंती केली की मी आज नसल्याने यावर उत्तर गुरुवारी द्या.
त्यांची ही विनंती मी मान्य केली. आता उद्या, गुरुवारी विधानसभेत मी याचे उत्तर देणार आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील व एसपीमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. या आरोपांना दिलीप वळसे-पाटील आज विधानसभेत उत्तर देणार होते. दरम्यान, विधिमंडळाच्या आवारात याच विषयावर पत्रकारांशी बोलताना गुरुवारी माझ्या उत्तरात ‘दूध का दूध पानी का पानी होईल’ असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सिक्युरिटी सर्व्हिसेसची सुरक्षा
गडकिल्ले हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या गडकिल्ल्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे किल्ले रायगडला विशेष सुरक्षा पुरविण्यात येईल. त्याशिवाय इतर गडकिल्ल्यांनाही गृह विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी सर्व्हिसेसमार्फत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिले. रायगड जिह्यातल्या येथील शिवकालीन कांगोरीगड व मंगळगड किल्ले व शिवकालीन कांगोरी मंदिरातील ऐतिहासिक वस्तूंच्या संदर्भात शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….