राज्यपाल-सरकार मध्ये संघर्षाची शक्यता ; विधानसभा अध्यक्ष निवडणूकचा पेज कायम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांची नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक होणार का याबाबत प्रश्ननिर्माण झाले आहे.
उद्यापासून (ता.३) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2022) सुरु होत आहे. आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शविला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत ९ मार्च रोजी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांना पत्र पाठविले आहे. पण या पत्राता अद्याप राज्यपालांनी उत्तर दिलेले नाही. आता पुन्हा राज्यपालांना स्मरणपत्र देण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.
यापूर्वी झालेले हिवाळी अधिवेशन कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केवळ आठ दिवसांचेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे यावेळी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी वाढवला आहे.
दरवर्षी नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन राज्यसरकारनं कोरोनाचं निमित्त पुढं करून मुंबईत घेतलं होतं. यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुढील अधिवेशन नागपूरमध्ये घेऊ असे सांगितले होते. मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील मुंबईतच घेण्याचे ठरले आहे.
”अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा सरकारचा मानस होता.परंतु, विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या माहिनुसार नागपूरमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृह उपलब्ध नाही. शिवाय तेथील आमदार निवास देखील क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये अधिवेशन घेणं शक्य नाही,” असे अनिल परब (Anil Parab)यांनी सांगितले.
मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण ,राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची झालेली ईडी चौकशी, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची ईडी चौकशी, ऊर्जामंत्र्यांनी दिलेले वीज तोडण्याचे आदेश, मदत व पुनर्वसन विभागाची ढिसाळपणा,या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….