युक्रेनमध्ये एक भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यू ; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कीव :- युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) दिली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे.
सांगायला अत्यंत दु:ख होतं आहे की, आज सकाळी खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.

मृत्यू झालेला विद्यार्थी मूळचा कर्नाटकचा
खरकिव मध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे. रशिया युक्रेनच्या युद्धाची झळ साऱ्या जगाला बसत आहे. यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….