भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा ; पैश्याची बॅग हिस्कावली ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील खडका येथे नव्याने सुरू झालेल्या इंडीयन ऑईल कंपनीच्या श्री दत्ता पेट्रोलियम या पंपावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला.दरम्यान रोकड असलेली बॅग घेवून बंदूकधारी दरोडेखोर पसार झाले आहेत. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,

पेट्रोल पंपावर तीन बंदूकधारी युवक आले.
त्यांनी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने दुचाकित पेट्रोल भरले.पैश्याची मागणी केली असताना पेट्रोल पंपावरील नोकराला बंदुकचा धाक दाखवून नगदी रोकड असलेली बॅग हिस्कावत दरोडेखोर पसार झाले. सदर बॅग मध्ये ५० हजार रुपयांची नगदी रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे.पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या दरोड्यातील दरोडेखोरांची संख्या तीन असल्याची सांगण्यात येत असून दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर महागाव च्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….