चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षाचा कारावास तर ६० लाखांचा दंड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पटणा :- चारा घोटाळाप्रकरणी डोरंडा कोषागार खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच कारावासाच्या शिक्षेसह ६० लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
चारा घोटाळ्याची वेगवेगळी प्रकरणं असून त्यामधील हे महत्त्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणी १५ फेब्रुवारीला न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह ३८ जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र, आज न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून यादवांना ५ वर्षांच्या कारावासासह ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लालूंच्या प्रकृतीत बिघाड
लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेची घोषणा होण्यापूर्वीच त्यांची प्रकृतीत बिघाड झाल्याचं सांगितलं जातंय. त्यांच ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल वाढलं असून त्यांचं शुगर लेव्हल १६० च्यावर पोहोचलं आहे. तर ब्लड प्रेशर १५०/७० पर्यंत पोहोचलं आहे. शिक्षेची सुनावणी होण्यापूर्वीच लालूप्रसाद यादव हे काल(रविवार) रात्रीपासूनच तणावात होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ब्लड प्रेशर आणि शुगरवर नियंत्रण मिळवणं कठीण झाल्यामुळे त्यांची प्रकृतीत बिघाड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
चार घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव तीन ते साडेवर्ष तुरूंगात भोगून आलेले आहेत. परंतु त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागणार की मेडिकल ग्राऊंडवर जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे प्रकरण १९९० च्या दशकातलं असून डोरांडा ट्रेझरीतील प्रकरण आहे. ज्यामध्ये सरकारी तिजोरीतून १३९ कोटी रूपये बेकायदेशीर पद्धतीने काढल्याचा आरोप लालूप्रसाद यादव आणि इतर ९९ लोकांवर आहे. या प्रकरणामध्ये यादवांनी ३ वर्षांपेक्षा जास्त तुरूंगाचा कारावास भोगला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….