काँग्रेसच्या गटनेतेपदी शैलेश कोपरकर ; जिल्हाध्यक्षांच्या पत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मान्यता ; काँग्रेस कींगमेकर विरोधी बाकावरची भूमिका बजावणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
नगरपंचायतच्या गटनेतेपदी शैलेश कोपरकर यांची वर्णी लागली आहे.त्याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मान्य केला असून शैलश कोपरकर यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
काँग्रेसने नगरपंचायीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा बळकावल्या.परंतु भाजपा आणि शिवसेनेने ने घरोबा करीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले.
त्यामध्ये काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी केली.भविष्यात पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी नगरसेवकांची जिल्हास्तरावर बैठक घेतली.आणि गट स्थापन करून गटनेतेपदी शैलेश कोपरकर यांच्या निवडीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला.त्यांच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव मान्य केला.आता काँग्रेस पक्षातील किंगमेकर शैलेश कोपरकर विरोधी बाकावरील भूमिका बजावणार आहे.