आर्णी येथील एका तरुणाने स्वतः च्या घरावर बसविले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच 5 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणार्या सचिन भोयर याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून अनेकांनी त्यांच्या या संकल्पनेचं कौतूक केलं आहे.
आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. घर बांधतेवेळी पाच फुट उंचीचा पुतळाही बसविला. 19 फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. शिवमहोत्सवदेखील साजरा होत आहे. परंतु, सचिन भोयर हा केवळ एकच दिवस नाही तर वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करतो. त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो.
पुतळ्यावरून राज्यात राजकारण होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा असे, आवाहन सचिन भोयर याने केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….