भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक ; ५४ स्मार्टफोन एप्सना केंद्राने बंदी घातली ; पहा कोणते एप्स बंद झाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारताने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे.
५४ स्मार्टफोन ॲप्सना केंद्राने बंदी घातली आहे. हे ॲप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले असून त्यात फ्री फायर या गेमचा तसेच ॲपलॉक ॲपचाही समावेश आहे.
युझर्सचा डेटा करत होते लीक
वरील सर्व ॲप्स युझर्सचा डेटा लीक करत होते, असा ठपका केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ठेवला आहे. या सर्व ॲप्सवर भारतात बंदी घालण्याचे आदेश गुगलच्या प्ले-स्टोअरलाही देण्यात आले आहेत.
या ॲप्सवर बंदी
स्वीट सेल्फी
एचडी- ब्युटी
कॅमेरा-सेल्फी कॅमेरा
इक्वलायझर व बास बूस्टर
सेल्सफोर्स
एंटसाठी कॅमकॉर्ड
आइसलँड २ : ॲशेस ऑफ टाइम लाइट
विवा व्हिडीओ एडिटर
टेन्सेंट एक्सरिव्हर
ओनमोजी चेस
ओनमोजी एरिना
ॲपलॉक
ड्युअल स्पेस लाइट
३००+ ॲप्सवर कारवाई
केंद्र सरकारने आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात चिनी लष्कराशी झालेल्या झटापटीनंतर भारताने जून, २०२० मध्ये ५९, जुलैमध्ये ४७, नोव्हेंबरमध्ये ४३ आणि डिसेंबरमध्ये ११८ ॲप्सवर बंदी घातली. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमानुसार केंद्र सरकारने ही ॲपबंदी केली आहे. मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या फ्री फायर गेमवरही बंदी आणण्यात आली आहे. हा गेम गुगलला प्ले स्टोअरवरून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….