निधी वेळेत खर्च करा :- जिल्हाधिकारी ; जिल्हा वार्षिक योजनेचा घेतला आढावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 11 :- जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम या तिन्ही योजनेतील निधी सर्व विभागांनी 15 मार्च पर्यंत खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम आणि खनिज प्रतिष्ठान निधीच्या खर्चाचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी बचत भवन येथे घेतला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते.
जिल्हा परिषद आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विभागांनी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित कामाचे कार्यादेश द्यावेत. दिलेला निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. निधी खर्च न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील असेही त्यांनी यावेळी बजावले.
नगर पालिका, क्रीडा विभाग, कौशल्य विकास, वीज वितरण कंपनी, यांनी मंगळवार पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अन्यथा निधी समर्पित करावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
खनिज प्रतिष्ठान निधीतून निधी देण्यात आलेल्या विभागांनी अद्यापही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, छायाचित्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले नाही. काम झाल्याचे आणि निधी खर्च झाल्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा विभाग, मेडा आणि वीज वितरण कंपनीने अद्यापही प्रस्ताव सादर न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. क्रीडा विभागाने तिन्ही योजनांमध्ये प्रस्ताव सादर न केल्याबाबत क्रीडा विभागाच्या कार्यप्रणालीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्रीडा विभागाची वेगळी बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. बैठकीला उपस्थित नसलेल्या विभागप्रमुखाना विचारणा करावी तसेच त्यांच्या वरिष्ठांना याबाबत अवगत करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिलेत.
बैठकीला संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….