सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकचा आज निकाल ; कोण बाजी मारणार या कड़े सर्व महाराष्ट्राचे लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 30 डिसेंबर रोजी पार पडली असून आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
सध्या शिवसेनेचं संचालक मंडळ असलेली ही बँक आता कोणाच्या हातात जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेसाठी 98.67 टक्के मतदान झाले होते. तर महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनल रिंगणात आहेत.
19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात
जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मतमोजणी सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
शिसेना सत्ता कायम राखणार ? की राणेंची सरशी
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र 2019 साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली आहे. तर 2019 साली सत्ता काबीज केल्यानंतर यावेळीदेखील सत्ता कायम राखण्याचे लक्ष ठेवून शिवसेना अर्थात महाविकास आघाडीने पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….