किराणा दुकानात घुसून तो रोज करतोय चोरी …. ६ वेळा केलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद ; महागाव शहरातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
एक दोन नव्हे तर मागील ६ दिवसांपासून एक अज्ञात भामटा मेन लाईन मधील एका किराणा दुकानात घुसून सराईतपणे चोरी करतो आहे. सकाळी ४.३० वाजता लोक साखर झोपेत असतात. या ठकसेनाने दुकानात डल्ला मारण्यासाठी नेमकी ही सोयीची वेळ निवडली. या धुर्त चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून त्याला पकडण्याचे पोलीसांपुढे आव्हान आहे. तहसील कार्यालय ते स्टेट बँक रोड ही गजबजलेली व्यापार पेठ. या मेन लाईनमधे किमान १० किराणा दुकाने आहेत.

(किराणा दुकानात साखर सकाळी प्रवेश करून गल्यावर हात साफ करताना , सीसीटीव्ही मध्ये कैद अज्ञात चोरटा)
विशाल ट्रेडिंग या किराणा दुकानात मागील काही दिवसापासून एक अज्ञात भामटा वरच्या दाराने बेमालूमपणे घुसून अगदी सराईतपणे चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेराने टीपले आहे. ओळख पटू नये म्हणून या भामट्याने पायघोळ सदरा घातला असून रुमालाने तोंड गच्च बांधलेले दिसते. गल्ल्यातील ठोक नोटा व सिगारेटची पाकीटे तो सातत्याने चोरत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. हातात टॉर्च घेऊन तो कार्यभार उरकतांना दिसतो. २१ दिवसांच्या रेकॉर्डिंग मध्ये तब्बल सहा वेळा त्याची चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली आढळल्यानंतर विशाल ट्रेडिंग चे संचालक विशाल चक्करवार यांना मोठा धक्का बसला. त्यांनी पो.स्टे.ला धाव घेत या घटनेची तक्रार दाखल केली. १५ हजारापेक्षा अधिक रक्कमेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….