“महाविकास आघाडी करतांना कॉंग्रेसला फसवलं जाईल” हे मी स्प्ष्ट सांगितले होते….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणूक प्रकिया सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत. यातच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रचार सभा घेत आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
अकोल्यातील नगरपंचायत काॅंग्रेसच्या ताब्यात द्या, आम्हा बदल करुन दाखवतो, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणारच आहे तसेच काँग्रेसही करीत आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीची गरज भासणार नाही, असं प्रचार सभेत बोलताना थोरात यांनी म्हटलं.
काॅंग्रेससाठी घेतलेल्या कालच्या प्रचार सभेत बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. अकोल्यात महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं आणि तसंच झालं. त्यामुळे मला अकोल्यात महाविकास आघाडी व्हावी अशी अपेक्षा होती मात्र खात्री नव्हती.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आता या निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….