“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ची जोरदार चर्चारंगलीआहे. सरन्यायाधीश यांनी युवकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा धागा पडकत कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक सोशल मिडिया अकाऊंट आणि पक्ष सुरू केलेल्या अभिजीत दिपकेंनी देशाचे लक्ष वेधले.
अभिजीत दिपकेंनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (cockroach janata party) इंस्टा आणि ट्विटरवरील अकाऊंने अवघ्या 4 दिवसांतच 10 मिलियन्सचा टप्पा पार केला होता. किंबहुनाहिदेशातीलपहिलीचघटनाअसल्याचेहीसमोरआलंआहे. सरन्यायाधीशांच्या टिपण्णीचा उपरोधिक शब्दांत विरोध करण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती. मात्र या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या उपक्रमांची आणि बोगस वकिलांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर भाष्य करताना सरन्यायाधीश सूर्य कांत (CJI Suryakant) यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना म्हटलं आहे की, ‘या प्रकरणात इतके भावुक होण्याची आवश्यकता नाही.’
तत्काळ सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही
दरम्यान, या याचिकेत न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यानच्या तोंडी टिप्पण्यांचा व्यावसायिक आणि प्रसिद्धीसाठी गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, बनावट पदव्यांच्या आधारे वकिली करणाऱ्या खोट्या वकिलांची चौकशी करण्याची मागणीही यात आहे. या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत योग्यवेळी न्यायालय या याचिकांची दखल घेईल, असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे.
न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यासाठी तथ्ये विकृत करून द्वेषपूर्णपणे सादर
दरम्यान, आज (सोमवारी) कॉक्रोच जनता पार्टी विरुद्धच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. दरम्यान, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी वकिलाला हे प्रकरण भावनिक न घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी योग्य वेळी होईल. सुनावणीदरम्यान, वकील एन. के. गोस्वामी यांनी सरन्यायाधीशांच्या ‘झुरळ’ या टिप्पणीचा संदर्भ देत म्हटले की, सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देऊनही, न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यासाठी तथ्ये विकृत करून द्वेषपूर्णपणे सादर केली जात आहेत.
आम्ही योग्य वेळी खटल्याची सुनावणी घेऊ; आता गरज नाही: सर्वोच्च न्यायालय
वकिलाच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “हे इतके भावनिक घेऊ नका.” जनहित याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याच्या मागणीसंदर्भात, सरन्यायाधीशांनी सांगितले की यात कोणतीही गंभीर तातडी नाही आणि सर्वोच्च न्यायालय नियमांनुसार योग्य वेळी त्यावर सुनावणी घेईल. या जनहित याचिकेत, न्यायालयातील संभाषणांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करू नये, असे निर्देश देण्याची आणि वकिलांच्या बनावट पदव्यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याच विषयावरील आणखी एका जनहित याचिकेत, सरन्यायाधीशांच्या ‘झुरळ’ या वक्तव्यानंतर उदयास आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या उपहासात्मक ऑनलाइन मोहिमेच्या कारवायांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….
जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी….
पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….