सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीतील राजकीय हालचालींबाबत मोठा दावा करत राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. रोहित पवार यांनी थेट नाव घेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भविष्यात भाजपमधूनच निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा केला.
त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीत नवा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार म्हणाले, “काहीही झालं तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार आहेत. त्यांच्यासोबत २२ आमदारांचंही ठरलेलं आहे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांचंही जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता मोघम बोलून चालणार नाही. जे आहे ते स्पष्ट आहे.”
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील काही आमदारही भविष्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, असा सूचक दावा करत रोहित पवार यांनी महायुतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं.
खर तर भाजप प्रवेशाची ही प्रक्रिया २०२९ पूर्वी होणार होती, पण आता ती थोडी लवकर सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी पुढे बोलताना तटकरे यांच्यावर निशाणा साधला. “जर त्यांनी आता भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला, तर पुन्हा निवडणूक लागू शकते. आणि तटकरे यांच्या मतदारसंघात निवडणूक झाली, तर ते निवडून येणार नाहीत. शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल,” असा दावा त्यांनी केला.
या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विशेषतः अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत समीकरणांवर आता चर्चा रंगू लागली आहे. रोहित पवार यांच्या दाव्यानंतर महायुतीतील नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….
“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….