उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- “सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) बायपासवर मंगळवारी (दि. १२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात टँकरमधील सुमारे १० हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक रोखली होती.
मिरज येथील डेपोतून पेट्रोल भरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा टँकर उदगाव बायपास मार्गावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने तो अचानक रस्त्यावर आडवा झाला. टँकरच्या वरच्या भागातून पेट्रोलची वेगाने गळती सुरू झाली होती. परिसरात उग्र वास पसरल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
धोका टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने बायपासवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवली. महामार्गावरील सर्व वाहने जयसिंगपूर शहरांतर्गत मार्गावरून उदगावच्या दिशेने वळवण्यात आली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचारण केले होते.
बायपास बंद करून वाहतूक शहरातून वळवल्यामुळे जयसिंगपूर-उदगाव मुख्य मार्गावर अवजड वाहनांची मोठी गर्दी झाली. सुमारे तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांच्या इंधनाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने टँकर उभा करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते.

२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….
“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….