“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छ. संभाजीनगर :- “नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर झालेल्या ‘बुलडोजर’ कारवाईचा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तीव्र निषेध केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कारवाईला ‘राजकीय सुडबुद्धी’ असल्याचे सांगत प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रशासकीय घाई आणि ‘गुंडाराज’
जलील यांनी विचारले की, मतीन पटेल यांच्या वकिलांनी न्यायालयात १५ दिवसांची मुदत मागितली असताना महापालिकेने त्याला विरोध का केला? “एवढी घाई करून कारवाई करण्याची काय गरज होती? शहरात फक्त एकच घर अनधिकृत आहे का? हा काय राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राज्यात सध्या लोकशाही नसून ‘गुंडाराज’ सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय शिरसाट यांना इशारा
निदा खान प्रकरणावरून मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांवर जलील आक्रमक झाले. “निदा खान माझी नातेवाईक आहे, हे शिरसाट यांनी पुराव्यासह सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांना न्यायालयात खेचेन,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला. शिरसाट हे काही न्यायालय नाहीत आणि त्यांच्या आरोपांना आपण काडीमात्र महत्त्व देत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार…
पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात…..
“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….