ठरलं..! लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आली, मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार खासदारकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणूक वाराणसीतून येथून लढणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही पाहिली यादी जाहीर करताना पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून येथून लढणार असल्याची माहिती दिली आहे.
तसेच यावेळी भाजपच्या १९५ उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहे.
यासोबतच भाजपकडून १६ राज्य आणि २ केंद्र शासीत प्रदेशांमधील तब्बल १९५ जागांचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यामध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत ३४ केंद्रीय व राज्य मंत्री हे निवडणूक लढवणार आहेत.
एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची नावे देखील १९५ उमेदवारांमध्ये आहेत. तसेच यामध्ये २८ महिलांचा समावेश आहे. ५० पेक्षा कमी वय असलेले ४७ युवा उमेदवार असणार आहेत. तसेच या यादीमध्ये अनुसूचित जाती २७, अनुसूचित जमाती १८, ओबीसी ५७ उमेदवार असणार आहेत, अशा प्रकारे समाजातील सर्व वर्गांना उमेदवारी देताना पहिल्या यादीत प्रतिनीधीत्व देण्यात आल्याचे देखील यावेळी भाजपकडून सांगण्यात आले.
पहिल्या यादीत ज्या राज्यांचा विचार झाला आहे ती यादी यावेळी सांगण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे जागांची घोषणा करण्यात आली.
उत्तर प्रदेश- ५१
पश्चिम बंगाल – २०
मध्य प्रदेश – २४
गुजरात – १५
राजस्थान – १५
केरळ – १२
तेलंगणा – ९
आसाम – ११ (एकूण जागा १४)
झारखंड – ११
छत्तीसगड – ११
दिल्ली – ५
जम्मू – काश्मीर – २
उत्तराखंड – ३
अरुणचाल प्रदेश – २
गोवा – १
त्रिपुरा – १
अंदमान – निकोबार – १
दीव आणि दमण -१