महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप..? ‘त्या’ 22 आमदारांची निवडणूक होणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जून 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. विधानपरिषद निवडणुकीनंतरच शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पुन्हा कोसळलं, यानंतर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका होणार आहेत.
यावर्षी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या पक्षातील मिळून विधानपरिषदेच्या 22 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे, यापैकी आज गुरूवारी 10 आमदारांचं शेवटचं अधिवेशन आहे. या 10 आमदारांचा निरोप समारंभही विधिमंडळात होणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. विधानसभेचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करतात, त्यामुळे विधानपरिषदेत पुन्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार पक्षांतर करण्याची शक्यता आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले अनेक आमदार या यादीत असल्याने हा मुद्दा निकाली काढला जाईल.
स्थानिक प्राधिकारी संस्थेचे आमदारांची नावं
1- अनिकेत सुनील तटकरे- राष्ट्रवादी अजित पवार गट 31 मे 2024 ( रायगड, रत्नागिरी सिंधदुर्ग )
2- नरेंद्र दराडे – नाशिक (शिवसेना ) 21 जून
3– रामदास आंबटकर ( वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली ) भाजपा 21 जून
4– विपलव बाजोरिया (परभणी- हिंगोली) शिवसेना 21 जून
5– प्रवीण पोटे पाटील ( अमरावती) भाजपा 21 जून
6– सुरेश धस ( उस्मानाबाद-लातूर-बीड) BJP 21 जून
7– आंबदास दानवे ( औरंगाबाद- जालाना ) शिवसेना ठाकरे गट विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते 29 ऑगस्ट
पदवीधर आमदार नावं
1– विलास पोतनीस ( मुंबई विभाग) शिवसेना 7 जुलै
2– निरंजन डावखरे ( कोकण विभाग ) भाजप 7 जुलै
शिक्षक आमदार
1– किशोर दराडे ( नाशिक विभाग ) अपक्ष 7 जुलै
2– कपिल पाटील ( मुंबई विभाग ) जनता दल यूनाइटेड 7 जुलै
महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निवडुन आलेले एकूण 11 आमदार
1– मनीषा कायंदे ( शिवसेना शिंदे गट ) 27 जुलै
2– विजय उर्फ भाई गिरकर ( भाजपा ) 27 जुलै
3– अबदुल्ला खान ( बाबाजानी दुर्राणी ) एनसीपी 27 जुलै
4– निलय नाईक ( भाजपा ) 27 जुलै
5– अनिल परब ( शिवसेना ठाकरे गट) 27 जुलै
6– रमेश पाटील ( भाजप ) 27 जुलै
7– रामराव पाटील ( भाजपा ) 27 जुलै
8– डॉ. मिर्झा वाजाहत मिर्झा अथर ( काँग्रेस ) 27 जुलै
9– प्रज्ञा राजीव सातव ( काँग्रेस ) 27 जुलै
10– महादेव जानकर ( राष्ट्रीय समाज पक्ष) 27 जुलै
11– जयंत पाटील ( Peasants and Workers Party of India (PWP) पक्ष ) 27 जुलै