नितीन गडकरी त्यांच्या राजकीय वारसाबद्दल म्हणाले………
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. आई-वडिल राजकारणात असेल की, ते मुलांसाठी तिकिट मागतात. पण मला त्या प्रकाराचा तिटकारा आहे” अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राजकारणातल्या घराणेशाहीवर आपलं मत व्यक्त केलं.
“राजकारण सोडून माझ्या सर्व गोष्टींवर तुमचा अधिकार आहे हे मी माझ्या कुटुबीयांना सांगितलं आहे. माझा राजकीय वारस हा माझा कार्यकर्ता आहे. कारण त्यांच्यामुळे आज मी मोठा झालो” असे नितीन गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या काळात कुटुंबीय प्रचारासाठी जातात.तेवढाच त्यांचा राजकारणाशी संबंध आहे असे गडकरी म्हणाले.
लहानपणी जिथे रहायचो तो भाग संघाला अनुकूल नव्हता
“लहानपणी नागपूरमध्ये मी जिथे रहायचो. तो भाग संघाला अनुकूल नव्हता. विरोध करणारा मोठा वर्ग होता. आम्ही संघात जायचो त्यावेळी लोक हेटाळणी करायचे, उपहास, अपमान करायचे. एकदिवस हे चित्र बदलून दाखवीन असा विश्वास होता आणि आज ते चित्र बदललं” असे गडकरी म्हणाले.
“त्या भागातलं राजकीय स्थित्यंतर मी बघितलं. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेली मंडळी सगळी भाजपामध्ये आली. निवडणुकीच्या काळात आम्ही जोरदार प्रचार करायचो. आमचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास असायचा पण निकाल यायचा त्यावेळी आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला असायचा. पण आता त्या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार ५० ते ६० हजार मताने निवडून येतो” असे गडकरी म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…