भाजप आमदाराच्या विरोधात संजय राऊत यांची सभा, आयोजक मात्र अजित पवार यांचा कट्टर समर्थक, चर्चा तर होणारच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संजय राऊत यांनी सभेच्या संदर्भात सांगत असतांना तेथील शेतकऱ्यांनी सभेचे आयोजन केले होते असेही सांगितले होते. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविरोधात संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे.
आज ही सभा पार पडणार असून त्याची तयारी सुरू आहे.
मात्र, हे आयोजन शेतकरी करत असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश थोरात यांनी केले आहे. सभेच्या स्थळी त्यांच्याकडून पाहणी आणि आढावा देखील घेण्यात आला आहे. रमेश थोरात हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहे. जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष देखील राहिले आहे.
एकूणच मैदान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गाजवणार असले तरी त्याचे नियोजन हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याने केले आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या विरोधात पुरावे घेऊन संजय राऊत हे सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
राहुल कुल यांच्यावर खरंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांना संजय राऊत यांनी हे आरोप केले होते. त्याचवेळी राहुल कुल यांनी संजय राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत थेट ईडीकडेही तक्रार केली आहे.
एकूणच संजय राऊत हे दौंड येथे सभा घेत असले तरी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदाराने सभेचे आयोजन केले आहे. संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतांना ही सभा होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.