पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ; अमरावतीसह देशातील ५ ठिकाणी होणार हा मेगा प्रकल्प….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषणा केली की, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत.
या पाच पार्कच्या माध्यमातून (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देतील. पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा देतील, त्याचबरोबर कोट्यावधीची गुंतवणूक आणतील आणि लाखो रोजगार निर्माण करतील. असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स, कापड उद्योग क्षेत्राला 5 एफ (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) दृष्टीकोनानुरूप चालना देतील. पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे उभारण्यात येतील ही माहिती सामायिक करताना आनंद होत आहे.’ “पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा पुरवतील, करोडोंची गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो रोजगारांची निर्मिती करतील. हे मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड याचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल.”
या पार्कच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. तसेच, याठिकाणी प्रचंड मोठा रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, या निर्णयाबद्दल दोघांनीही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…