मुंबईतील मालाड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग ; अनेक घरं जळून खाक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील मालाड पूर्वमधील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
मालाडमधील आप्पा पाडा परिसरात ही झोपडपट्टी असून, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे.
सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आणि 100 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. आग लागल्यानंतर आगीचे लोळ परिसरात पसरले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…