नितीन गडकरी यांच्या नावाने ‘फेक पोस्ट’ ; नागपूर पोलिसांनी केली मोठी कारवाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट प्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांकडून फेक पोस्ट प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितिनुसार, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावे फेक पोस्ट करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी हा ठाकरे गटाचा आर्णी तालुका अध्यक्ष असून प्रविण देशमुख असे त्याचे नाव आहे. आरोपी प्रवीण देशमुख सध्या नागपूर सायबर सेलच्या ताब्यात होता.
नागपूर (Nagpur) पोलिसांच्या सायबर सेलने प्रवीण देशमुखची चार तास चौकशी केली. चौकशीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला सूचनापत्र देऊन सोडण्यात आलं आहे. कसबा निवडणुकीनंतर त्याने नितीन गडकरी यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. या फेक पोस्टमध्ये नितीन गडकरी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. पण ही पोस्ट फेक (खोटी) असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी गडकरी यांच्या कार्यालयाकडून नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, नागपूर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…