ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लेखक , नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेतून बालकलाकारच्या भूमिकेतून रंगभूमीवर पाऊल टाकणारे ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ८५ वर्षांचे होते. राजा बापट यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘सागर माझा प्राण’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘यशोदा’, ‘श्रीमंत’ या नाटकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
याव्यतिरिक्त ‘दामिनी’, ‘समांतर’, ‘झुंज’, ‘वादळवाट’, ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. ‘बाळा गाऊं कशी अंगाई’, ‘एकटी’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘प्रीत तुझी माझी’, ‘थोरली जाऊ’, ‘व्हेंटिलेटर’ आदी मराठी, तर ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी आणि इंग्रजी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी मालिका आणि नाटकांमध्येही कामे केली होती. ‘ढाई आखड प्रेम के’, ‘चुप कोर्ट चालू है’ ही हिंदी नाटके तर ‘वख्त की रफ्तार’, ‘दुश्मन’, ‘खोज’ या हिंदी मालिकांमध्येही छोटेखानी भूमिका केल्या होत्या.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…