संजय राऊत यांच्या बॉम्बवरुन रवी राणा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, रवी राणा थेट बक्षीसच देणार……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी नुकताच एक सुतळी बॉम्बचा फोटो शेअर करत मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते, त्यावर आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच चाळीस आमदार गेले हाच बॉम्ब फुटला आहे. आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे सुद्धा दिसणार नाहीत अशी टीका रवी राणा यांनी केली. याच वेळी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेलमध्ये जातील असा इशारा सुद्धा राणा यांनी नागपूरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन असं खुलं आव्हान देखील राणा यांनी दिलं आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू सुरू आहे. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत हे देखील नागपूर दौऱ्यावर आहेत.
नागपूर दौऱ्यावर असतांना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असून वातावरण अधिकच तापलं आहे.
हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान नागपुरात आलेल्या संजय राऊत यांनी सुतळी बॉम्बचा फोटो ट्विट केला होता, त्यावरुन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले होते.
एकूणच सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत असतांना आमदार रवी राणा यांनी थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील असा इशारा दिला आहे.
संजय राऊत यांच्या उद्धव ठाकरे यांना बक्षीस देईल असे म्हणत रवी राणा यांनी अडीच वर्षात काय केलं असा सवाल उपस्थित केला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…