विरोधकांच्या टिकेनंतर आज सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याचा ठराव कर्नाटक विधानसभेत पास करण्यात आला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही आज कर्नाटकविरोधात ठराव आणण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी सीमावादार आत्तापर्यंत ब्र सुद्धा काढला नाही. अशी टीका ठाकरे यांनी केली.
दरम्यान, सर्व घडामोडीनंतर विधानसभेत कर्नाटकविरोधात ठराव आणण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात केलेल्या ठरावानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही कर्नाटकविरोधात ठराव आणण्यात येणार आहे.
सीमावादावरून राज्य सरकार मागं हटणार नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता आज विधानसभेत याबाबतचा ठराव आणण्यात येणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…