सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची विधानभवन पायऱ्यांवर घोषणाबाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- राज्य सरकारची धोरणे आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर पारंपरिक लोकगीते म्हणत निषेध नोंदवला.

तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी काँंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.
नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून दुसऱ्या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे. आजही अधिवेशनाचे सत्र सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. टाळांच्या गजरात पारंपारिक गाणे म्हणत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन वाटपात दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करीत सोमवारी विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला होता. आजही सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…