दिशा सालियान प्रकरणाची चौकशी करा, शिंदे गटाने उकरला मुद्दा, आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा गोंधळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या पुन्हा एकदा उकरण्यात आला आहे. शिंदे गटाने दिशा सालियान प्रकरणाची चौकशीबाबत मुद्दा उपस्थितीत केला. भाजपचे आमदार नितेश राणेंनीही आक्रमक मागणी केली.
त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी थांबवले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
दिशा सालियानचा मृत्यू कशामुळे झाला, तिने आत्महत्या केली की तिला इमारतीवरून खाली फेकले आहे का? दिशा आणि सुशांत यांच्यामध्ये फोनवर संवाद झाला आहे का? याची तपशील उघड झाली नाही. दिशाने काही तरी माहिती पोहोचवली, त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
या प्रकरणी सीबीआयने अद्याप कोणताही रिपोर्ट दिला नाही. यात काही तरी तथ्य आहे, दिशाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अजून समोर आला नाही. तिच्या सोबत त्यावेळी कोणकोण होतं, याची माहिती समोर आली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोगावले यांनी केली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज सकाळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड यांच्यासह अन्य आमदार हे ये ‘AU, AU कौन है’ असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या आमदारांनी श्रीखंडाचे डब्बे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…