ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले.
यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे – 35, पालघर – 62, रायगड – 191, रत्नागिरी – 163, सिंधुदुर्ग – 291, नाशिक – 188, धुळे – 118, जळगाव – 122, अहमदनगर – 195, नंदुरबार – 117, पुणे – 176, सोलापूर – 169, सातारा – 259, सांगली – 416, कोल्हापूर – 429, औरंगाबाद – 208, बीड – 671, नांदेड – 160, उस्मानाबाद- 165, परभणी – 119, जालना – 254, लातूर – 338, हिंगोली – 61, अमरावती – 252, अकोला – 265, यवतमाळ – 93, बुलडाणा – 261, वाशीम – 280, नागपूर – 234, वर्धा – 111, चंद्रपूर – 58, भंडारा – 304, गोंदिया – 345, गडचिरोली- 25. एकूण – 7,135.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…