ज्ञानवापी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा झटका ; न्यायालयानं दिला स्पष्टच निकाल….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाराणसी :- ज्ञानवापी प्रकरणी मुस्लीम पक्षाला मोठा झटका बसला आहे.
ज्ञानवापी प्रकरणी मुस्लीम पक्षाला मोठा झटका बसलाय. न्यायालयानं मुस्लीम पक्षाची याचिका रद्द केलीय. या प्रकरणी हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी होऊ नये, अशी याचिका मुस्लीम पक्षानं दाखल केली होती.
मात्र, हिंदू पक्षाची याचिका सुनावणीयोग्य असून त्यावर सुनावणी होऊ शकते, असं मत नोंदवत न्यायालयानं मुस्लीम पक्षाची याचिका रद्द केलीय. फास्ट ट्रॅक कोर्टानं गुरुवारी हा निर्णय दिलाय.
स्वयंभू ज्योतिर्लिंगाची पूजा तात्काळ सुरू करून हा परिसर हिंदूंच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती हिंदू पक्षानं याचिकेत केली होती. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (फास्ट ट्रॅक कोर्ट) महेंद्र कुमार पांडे यांच्या कोर्टानं ही याचिका सुनावणीयोग्य असल्याचं म्हटलंय. न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख 2 डिसेंबर निश्चित केलीय.