जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं विधान केले होते.
त्यानंतर आता छगन भुजबळ आणि इतर 2 जणांवर आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तक्रारदाराने चेंबूर पोलीस ठाण्यात छगन भुजबळ आणि इतरांनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याबद्दल जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?
“शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.
माझ्या वक्तव्यावर मी अजूनही ठाम – छगन भुजबळ
“समता परिषदेच्या व्यासपीठावर माझ्या कार्यकर्त्यांसमोर मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देव कुणाला मानावे आणि कुणाची पूजा करावी याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुठलाही माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी स्वतः माझ्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. सप्तशृंगी कोटमगाव देवीच्या दर्शनालाही जातो. मात्र कोणता देव मानावा आणि कोणाची पूजा करावी हे माझे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा या वक्तव्याशी संबंध नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये,” असे छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…