शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीत रात्री १२ वाजेपर्यंत खेळता येणार गरबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. भाविकांना यंदा उत्सवाचे शेवटचे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबासाठी मुभा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीक्षेपक वापरास वाढीव दिवसाची सूट देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार १, ३ आणि ४ ऑक्टोबरला सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरता येणार आहे. तसेच मुंबईमध्ये यंदा नवरात्रौत्सवासाठी ३ व ४ ऑक्टोबर व्यतिरिक्त १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार.
सरकारकडून रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी दिली आहे, यापूर्वी ती वेळ रात्री १० वाजेपर्यंत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईमध्ये यंदा ३ व ४ ऑक्टोबर व्यतिरिक्त १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…