शाळेत सरस्वती, शारदा मातेची पूजा कशाला? भुजबळांच्या विधानावरून वाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांच्या विधानावर ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला आहे. भुजबळ यांनी भाषणावेळी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची?
असं विधान आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे.
अखिल भारतीय समता परिषदेवेळी बोलताना भुजबळांनी हे विधान केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
तसेच ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा. हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया असं विधान छगन भुजबळांनी केलं. भुजबळांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी ब्राह्मण संघटनांनी घेतला आहे.
राज्यात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जूनं धोरण आहे. छगन भुजबळ अंमलात आणत आहेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांना लक्ष्य केले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…