मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, माजी एटीएस अधिकाऱ्याविरुद्ध वॉरंट जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नाशिकच्या मालेगावमध्ये 2008 मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट (Bomb Blast) प्रकरणात विशेष न्यायालयाने आज महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या माजी अधिकाऱ्या ( Ex Officer ) विरुद्ध जामीनपात्र वॉरंट ( Bailable Warrant ) जारी केले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने हे वॉरंट बजावले. एटीएसच्या संबंधित माजी अधिकाऱ्याने सुनावणीदरम्यान हजेरी न लावल्याबद्दल जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2008 च्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता.
संबंधित माजी एटीएस अधिकाऱ्याने मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि इतर चार जणांना अटक केली होती. त्या अधिकाऱ्याला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते. पण तो अधिकारी हजर झाला नाही.
न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी
याप्रकरणी न्यायालयाने माजी एटीएस अधिकाऱ्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्या माजी अधिकाऱ्याला 13 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
एटीएसवर छळ केल्याचा आरोप
याआधी डिसेंबर 2021 मध्ये एका फिर्यादी साक्षीदाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) चार नेते इंद्रेश कुमार, काकाजी, देवधरजी, स्वामी असीमानंद यांना खोटे गुंतवण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने त्यांचा छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता.
बॉम्बस्फोटात सहा जण झाले होते ठार
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलला बांधलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. त्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित, प्रज्ञा सिंह ठाकूर, समीर कुलकर्णी, अजय राहीकर, रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर कलम 16 (दहशतवादी कृत्य करणे) आणि 18 (षडयंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…