“मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिंदे गट आणि भाजप पक्षाच्या नेत्यांना समान वाटप करण्यात आले.
परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री केले आहे. त्यामुळे यामुद्यावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा जिल्हे कसं सांभाळणार असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधाला होतो.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
नाना पटोले यांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय.
मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात, असं म्हणत फडणवीस यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात. ते ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा.
त्यांच्या विनोदावर आम्हाला रिएक्शन का विचारता. ते बेताल बोलतात आणि बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याएवढा आमच्याकडे वेळ नाही. तसेच नाना पटोले यांचं राज्य आलंच तर त्यांना तीन-चार जिल्ह्यांचे पालकमंत्री ठेवले, तर मी त्यांना ते कसे मॅनेज करायचे ते सांगेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पटोलेंचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं दिसून येतं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…