अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला आदेश देत सांगितलं “लवकरात लवकर.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालायने काहीसा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने २१ मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका प्रलंबित असल्याची नोंद घेतली.
“जामीन अर्ज दाखल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल अशी कायदेशीर अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणं कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही,” असं खंडपीठाने सांगितलं.
“आम्ही एक निर्देश जारी करत असून याचिकाकर्त्याला ज्या न्यायमूर्तींकडे खटला सोपवण्यात आला आहे त्यांच्यासमोर अर्ज करण्याची परवानगी देतो. हा अर्ज याच आठवड्यात सुनावणीसाठी घेतला जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल,” असं खंडपीठाने स्पष्ट केलं.
दरम्यान न्यायालयाने या प्रकरणावर इतर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयात एन जे जामदार यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…