राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार ; दीपक केसरकरांची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे. त्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे सर्वेक्षण आरक्षणासाठी नाही. मागील सरकारच्या काळात जे निर्णय घेतले गेले, त्यात आक्षेपार्ह काही असल्यास बदल केले जातील.
त्यासाठी हे सर्वेक्षण आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असतं, असंही दीपक केसरकरांनी यावळी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण हे प्राधान्याने देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी स्वतः तज्ज्ञाशी दिल्लीत जाऊन चर्चा केली आहे. त्यामुळे निश्चितपणे यातून मार्ग निघेन, अशी आमची खात्री आहे, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. शिक्षण विभागात महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती केली जाणार असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं.
कोकणात ५ हजार शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार असून अतिरिक्त शिक्षणाचे समायोजन करून राज्यात शिक्षण विभागात मेगा भरती केली जाणार आहे. तसेच ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार असून याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…