मोदी व शहांना अनेकदा भेटलोय, या भेटींचा वेगळा अर्थ काढू नका :- एकनाथ खडसे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची सून रक्षा खडसे हिच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. त्यासाठी ते दिल्लीतही गेले होते. त्यामुळे खडसे हे पुन्हा घरवापसी करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येत या बातम्यांचं खंडण केलं आहे.
‘अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहांना भेटू नये का? अमित शहा व नरेंद्र मोदींशी माझे जुने परिचय आहेत. मी त्यांना एकदा भेटलो असे नाहीए. याआधीही अनेकवेळा भेटलो आहे व यानंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींना देखील भेटणार आहे. याचा अर्थ वेगळा काढू नये. मी राष्ट्रवादी मध्ये आहे. माझी सून भाजपमध्ये आहे’, असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांची सून व भाजपच्या लोकसभा खासदार रक्षा खडसे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट केलं आहे. ‘अमित शहा यांच्या भेटीसाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो पण त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण नाथा भाऊ व अमित शहा यांची फोनवर चर्चा झाली आहे. नाथा भाऊ भाजपमध्ये येणार की नाही याबाबत मला काही कल्पना नाही. मी भाजपमध्ये आहे आणि नाथा भाऊ राष्ट्रवादीमध्ये आहेत’, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…