जागतिक मंदीचा इशारा..? ; मोदी घेणार मंत्र्यांची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याचा इशारा जागतिक बँकेने दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले मंत्री आणि सचिवांची एका दिवसभराची मॅराथॉन बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची चर्चा बैठकीत होईल.
याच महिन्यात ही बैठक होणार आहे. आगामी २ वर्षांच्या आत लाेकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशासमोरील आव्हानांचा आढावा या बैठकीत घेणार आहेत.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी हे वर्षातून २ वेळा मंत्र्यांसोबत अशा प्रकारच्या मरॅथॉन बैठका नियमितपणे घेत आले आहेत. सचिवांसोबतही अशा बैठका ते घेत असतात. सार्वत्रिक निवडणुका १८ महिन्यांवर आल्यामुळे प्राधान्याची क्षेत्रे कोणती असावीत, हा बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.
सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन मे २०२४ च्या निवडणुकांपूर्वी ते कसे पूर्ण करता येऊ शकतील, यावरही बैठकीत चर्चा होईल. बैठकीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका मात्र जारी करण्यात आलेली नाही. सहभागितांना अनौपचारिकरीत्या त्याबाबत कळविले जात आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने महागाईच्या नियंत्रणासाठी आणखी उपाययोजना करण्याची तयारी चालविली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…