कॉंग्रेस कडून पक्षाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसने पक्षाध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल होतील. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मुदत आहे. तर १ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारांची यादी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केली जाईल.
अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाईल. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यालयात मतदान होईल. निवडणूक निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार असल्याचे काँग्रेसचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आता मोठ्या बदलाच्या दिशेने जात आहे. दशकानंतर गांधी कुटुंबीयांबाहेरचा अध्यक्ष पक्षाला मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पक्षातले वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत आग्रह केल्याचे समजते. दरम्यान, शशी थरुर यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…