राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन जगतासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. या दु:खाच्या प्रसंगी राजूच्या पत्नीला आणि कुटुंबाला खंबीरपणे लढण्याची हिंमत देवो अशी प्रार्थना राजू यांचे चाहते करत आहेत. नुकतेच त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. आता उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. उद्या दिल्लीतील निगम बोध घाटावर त्यांना अंतिम निरोप देण्यात येणार आहे.
वृत्तांनुसार, राजू श्रीवास्तव या लोकप्रिय विनोदवीराच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, उद्या सकाळी राजू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील निगम बोध घाटाच्या व्हीआयपी विभागात राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव द्वारका येथून निगम बोध घाटावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा शेवटचा निरोप दिला जाईल.

नुकतेच राजू श्रीवास्तव यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. ज्याच्या अहवालात त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात ४२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या शरीरावर फक्त इंजेक्शनच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. अहवाल आल्यानंतर आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगण्यात आले. उद्याच्या तारखेला त्यांच्या मृत्यूचा मुद्दा कोणी काढू नये म्हणून हे आवश्यक होते. तसंच त्यांचा मृत्यू हे गूढ होतं असं म्हणण्याची संधीही कुणाला मिळू नये म्हणून पोस्टमॉर्टम केल्याचे बोलले जात आहे. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…