ठरलं… सगळ्या जिल्ह्यांना याच आठवड्यात मिळणार पालकमंत्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जवळपास तीन महिने लोटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटप पूर्ण झालेलं नाही. तसंच अजूनही राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही.
त्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात असतानाच आता सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती हाती येत आहे.
याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती पत्रकारांच्या सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन या नियुक्त्या खोळंबल्या होत्या. अतुल सावे की संदीपान भुमरे कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न होता. मात्र आता हे पद शिंदे गटाकडे जाणार आहे. संदीपान भुमरे औरंगाबादचे नवे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता हा तिढा सुटला आहे.
कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होणार आहेत. पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबली होती. विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन टीका केली जात होती. मात्र आता हा तिढा सुटल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…