ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी ; शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर मिळवता आलं विजय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी 19 सप्टेंबरला या शेकडो गावांचे निकाल लागत आहेत.
या मतमोजणीतून आतापर्यंत हाती लागलेल्या निकालानुसार सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे, तर सर्वात कमी ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत.
भाजपने 37 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी 19 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत दुस-या स्थानावर आहे. शिंदे गटाने 5 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे, तर सर्वात कमी म्हणजे 4 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाचा विजय झाला आहे. तर इतर पक्ष आणि आघाड्यांचा 10 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.
नंदूरबार आतापर्यंतचे जाहीर निकाल
नंदुरबार ग्रामपंचायतींची संख्या-19
भाजप- 13
शिंदे गट- 04
काॅंग्रेस- 02
राष्ट्रवादी-00
अपक्ष-00
ठाकरे गट- 00
दिंडोरी तालुक्यातील निकाल
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे पॅनल विजयी, सरपंचपदी सुभाष नेहरे विजयी, मोहाडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे पॅनल, सरपंचपदी आशा लहानगे विजयी, दिडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन तर ठाकरे गट एका जागेवर विजयी.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…