राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन…? ; तरी दौरा करणारच…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याची बातमी काही वेळेपूर्वी पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये असा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं जात होतं.
पण या बातमीचं खुद्द शरद पवार यांनीच खंडन केले आहे.
मुंबई पोलीस कंट्रोल रूमकडे धमकीचा फोन आल्याची बातमी होती. पण मुंबई पोलिसांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे. शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याची बातमी व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पण नंतर शरद पवारांनीच याचं खंडन केलं आहे.
शरद पवार सोलापूरच्या कुर्डुवाडीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी येथे पत्रकार परिषद देखील घेतली. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यावर देखील यावेळी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला कुणी विरोध करत नाही. गेल्या 40 वर्षापासून बाळासाहेबांची आणी आता उद्धव साहेब यांची शिवसेना आहे. शिंदे साहेब यांनाही मेळावा घ्यायचा अधिकार आहे. पालकमंत्री नेमणूकीला विलंब करणे योग्य नाही. असं देखील ते म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…