मोठी बातमी ; १५ लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांला नालासोपाऱ्यात अटक ; महाराष्ट्र ATS ची कारवाई…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य हुलाश यादव (४५) याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत यादव हा औषधोपचाराकरीता नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून यादवला ताब्यात घेतले आहे. यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्य आहे. तो सन २००४ पासून नक्षली कारवाई मध्ये सक्रिय असून त्याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. आरोपीबाबत झारखंड पोलीसांना माहिती देण्यात आली असून, त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…