राज ठाकरेंचं आज पासून “मिशन विदर्भ” ; 5 दिवस विदर्भ दौरा ; नागपुरात जंगी स्वागत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. त्यांचं नागपूर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
राज ठाकरे आज नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. याशिवाय या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटीही घेतील.
मनसेकडून पोस्टर आणि बॅनर्स लावून स्वागत
राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि रेल्वे स्थानकापासून राज ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलपर्यंत मनसेकडून मोठ्या प्रमाणावर पोस्टर आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. हिंदू जननायक राज ठाकरे यांचे संत्रा नगरीत स्वागत अशा आशयाने राज ठाकरे यांना हिंदू जननायक संबोधन ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. नागपुरात आज राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत.
संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. ते रविभवनात आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळं विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात तसेच संघटना वाढीसाठी या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
राज ठाकरेंचं मिशन विदर्भ
राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी आजपासून 5 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
आज सकाळी 11 वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर राज ठाकरे नागपूर शहर आणि ग्रामीण मधील कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठका करतील.
19 सप्टेंबर- गाठीभेटी आणि राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते चंद्रपूरला रवाना होतील.
चंद्रपुरात त्यांचं जंगी स्वागत होईल आणि विभागवार बैठका होतील.
20, 21 सप्टेंबर- अमरावतीत विभागवार बैठका होतील.
22 सप्टेंबर- तारखेला राज ठाकरे मुंबईत परततील.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…